अभंग ३८

श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.


राग - आरबी
( चाल : नामोकी बलहारी )

देव ओळखावा ज्ञानचक्षूने पाहावा ॥
ज्यांचा निर्मळ शुद्ध भाव ॥
त्यासी दूर नसे देव ॥धृ॥
देव प्रेमाचा भुकेला ॥
भक्ता अंक्ति मग तो झाला ॥१॥
किंचित् येता अहंपण मना ॥
त्यापासुनी दूर राहे यदूराणा ॥२॥
ज्यांच्या अंगीं असे दया लीनता ॥
तेची आवडती भगवंता ॥३॥
जयाचा असे हरिपायीं भाव ॥
दासी म्हणे तेच ओळखती देव ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP