अभंग २

श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.


राग - केदार

आयुष्यांतील दिन हे सुखाचे ॥
लाभले मज संतसेवेचे ॥धृ॥
सात्त्विकतेची पवित्र लहरी ॥
वायुसहित पसरली गृहीं ॥२॥
सुबोध बोल संत मुखांतील ॥
ऐकुनी समाधान झालें चित्त ॥३॥
अती भाग्य माझें म्हणुनी ॥
संत कृपेचा लाभ दिनंदिनीं ॥४॥
लाभ झाला मला प्रभू कृपेन
अत्यादरें दासी करी नमन ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP