अभंग ३१
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
चालतां पूज्य पंढरीची वाट ॥
हृदयांत आनंद भरला दाट ॥धृ॥
पंढरीशाची आतां होइल भेट ॥
पाहीन मग हरि दरबाराचा थाट ॥१॥
विठ्ठलराज माझा देवाधिदेव ॥
पाहतां अंतरी उचंबळे प्रेमभाव ॥२॥
अति आदरें चरणावर डोई ठेवुन ॥
मग पाहिन मुखचंद्र न्याहाळून ॥३॥
पाहातां तें शांत सुंदर श्यामल मुख ॥
वाटे त्याविणें नसे जगीं दुजें सुख ॥४॥
सकल जगाचा जो असे सौख्य जीवन ॥
त्या पांडुरंग चरणीं दासीचें साष्टांग नमन ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP