अभंग १०

श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.


राग -
( चाल : आजी गुरुकृपा )

क्षण एकही न जाई वाया ॥
तव चिंतनाविण देवराया ॥धृ॥
निज ध्यास तुझाची देवा ॥
दिन - रात लागला जिवा ॥१॥
एक उत्कृष्ट दासीची मनीषा ॥
दावी कृष्णरूप जगदीशा ॥२॥
मग कृतार्थ होईल जीवन ॥
ऐसे भावनामय हें मन ॥३॥
दासी ही असे मतीहीन ॥
पुरवी आस तूं दयाघन ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP