अभंग १४
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - मांड
( चाल : कशी जाऊ मी वृन्दावना )
हरीचरणी ठेवितां भाव ॥
मनुजा तरशील भव पार ॥धृ॥
हरी वाचुनी विचार मनी ॥
दुजे आणु नको चिंतनी ॥१॥
हृदयी अखंड वसो श्रीहरी ॥
हीच आस असे अंतरी ॥२॥
सर्वस्व वाहुनी तुझे पायी ॥
झाली दासी निश्चिंत विठाई ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP