अभंग २१
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - जयजयवंती
( चाल : सद्गुरु नायके )
श्रीपांडुरंग दर्शनें झालें मी पावन ॥
शुद्ध पवित्र झाले तनमन ॥धृ॥
आतां दुजें न कांही उरलें कारण ॥
हरिनाम गान अखंड चिंतन ॥१॥
नामेंच स्थीर होई चंचल मन ॥
श्यामसुंदर रूपाचें अंतरीं घ्यान ॥२॥
गुरुकृपें लाभलें आनंद समाधान ॥
श्रीपांडुरंग चरणीं दासी करी नमन ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP