अभंग १७

श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.


राग - सारंग
( चाल : अवघेची त्रैलोक्य )

रंगले रंगले कृष्णरूपी रंगले ॥
भाव दुजे आतां मुळी न उरले ॥धृ॥
कोहं सोहं, भाव एक जाहले ॥
आनंदी आनंद, आत्मानंदी रंगली ॥१॥
नील - पीत - श्वेतरंगी, कमल नयनी फुलले ॥
हिरकणीसम मध्य, बिंदु तेज चमकले ॥२॥
ह्या तेजे योगे, देह भाव नुरले ॥
दासीने मग अंतरी, स्वरूप पाहिले ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP