अभंग ३०

श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.


राग - भीमपलास
चाल : ‘ गुरुरायांनी नवलाव ’

भाग्य उदया मम आले, धन्य जिवनी झाले ॥
पांडुरंग मूर्तीमध्यें कृष्णरुप पाहिले ॥धृ॥
राऊलामाजी भजन करीतां झाले होते दंग ॥
कृष्णरुप दाऊनी मज कृतार्थ केले पांडुरंग ॥१॥
काय सांगु ते सुख बोलता नये वाचे ॥
मन हे उन्मन झाले. गेले मीपण माझें ॥२॥
तेव्हांपासूनी कृष्णरुपी मन माझें जडले ॥
श्यामसुंदर मुरलीधराचे वेड मज लागले ॥३॥
भजन हरीचे करीतां भान न राहे देह अवस्था ॥
ऐसी स्थिती होता दासी रंगुनी जाई तत्त्वता ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP