अभंग २३

श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.


राग - बिहाग
चाल : झाली ही पुनित वैरवरी

अति दु:ख होई मम जीवा ॥
नियमित न घडे तुझी सेवा ॥धृ॥
दुबळे शरीर जाते वाया ॥
तेणे अंतर पडे तुझीया सेवा ॥१॥
तुझ्या नामाविण उपाय न दुजा ॥
तुझें नाम हेच औषध जिवा ॥२॥
नामेच आंगी बळ, उत्साह येई देवा ॥
ऐसा तुझा महिमा आहे केशवा ॥३॥
दीन पामर काय वर्णेल महिमा ॥
दासीचें साष्टांग नमन पुरुषोत्तमा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP