अभंग २०

श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.


राग - मिश्रमांड
( चाल : आराम जो मनाचा )

भजनासी रंग चढला ॥
कान्हा नाचू डोलु लागला ॥धृ॥
पैंजण नाद छुम छुम घुमला ॥
दशदीशांनी आनंद फुलला ॥१॥
नाचतां सखा माझा शीणला ॥
घ्या विसावा आतां कोमला ॥२॥
काय सांगु त्या आनंदी समयाला ॥
शब्द नच पुढे लिहिण्या उरला ॥३॥
दासी भाग्य आलें उदयाला ॥
अनन्य भावें नमित पदाला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP