अभंग १६
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - यमनकल्याण
( चाल : राधाधर मधु मिलिंद जयजय )
वेणुधर गोवींद जय जय
रुक्मिणीपती श्रीकृष्ण जय जय ॥धृ॥
वृंदावनी करी रास महोत्सव ॥
गोपी झाल्या आनंदीत ॥१॥
शरदाची चांदणी रात ॥
मुरलीचा तो मधुर आलाप ॥२॥
पैंजणाचा नाद छुम छुम ॥
घुमला नाद त्रीभुवनांत ॥३॥
देव गंधर्वादि विमानांतुन ॥
पुष्प वृष्टी करती सुगंधीत ॥४॥
त्रीभुवन झाले आनंदीत ॥
दासी झाली समरस त्यांत ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP