अभंग १८
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - खमाज
( चाल : मनपोळे सदा हे सखे त्याकडे )
अती उल्हासे आले पंढरी नगरीं ॥
माझ्या हो माहेर घरी ॥धृ॥
माय - बाप माझा उभा विटेवरी ॥
प्रेमभरे डोई ठेवीली चरणावरी ॥१॥
दृष्टी स्थिरावली मुखावरी ॥
तेथुनी दृष्टी न फिरे माघारी ॥२॥
हरीच्या गळां घातली हो मिठी ॥
हरीमुखी हास्य पाहिले दृष्टी ॥३॥
आनंद न समाये माझे मनी ॥
दासीचे भान गेलें हरूनी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP