अभंग ३
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - मांडपहाडी
( चाल - कृष्णनाथभृंगहा )
आजी मंगल नुतन वर्षारंभ उदेला ॥
उगवत्या भानुसह शुभ दिन आला ॥धृ॥
प्रभाती श्रीकृष्णासी आदरे वंदिले ॥
आनंदाने प्रेमभरे नाम गाईले ॥१॥
उल्हासित मनाने हरिपूजन केले ।
एकरूपता अंतरीं येता तल्लीन झाले ॥२॥
वर्षारंभी सुदिनी हा आनंद लाभला ॥
अज्ञमती काय वानु त्या सुखाला ॥३॥
अखंड लाभो हा आनंद दासीला ॥
हेंच मागणें मागतसे तुम्हा विठ्ठला ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP