अभंग ९
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - मीश्रमांड
चाल : देहीं देखीली
जेथे लागे संतपायधूळ ॥
तेंची घर असे सोज्ज्वळ ॥धृ॥
जें हृदय असे निर्मल ॥
तेथें वास करी गोपाळ ॥१॥
कृष्णसखा असे प्रेमळ ॥
भक्त जनांची माय कृपाळ ॥२॥
भक्त हांकेसी येई सर्वकाळ ॥
दासी प्रेमादरें नमीत गोपाळ ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP