Dictionaries | References

संबळ

   
Script: Devanagari
See also:  सबल , सबळ , सब्बल

संबळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
sambaḷa m A musical instrument of the tabor kind. It consists of two members, viz. पडगा or घा or पडगी or झील the smaller one, sounding the treble; and the बंब, धूम or धम the larger one, sounding the bass.
sambaḷa or sabaḷa f m A bickern that is divided at one end into two parts, a crowbar. Note. Distinction is made by some between these two words. संबळ is understood to be m, and to mean A large bickern or पहार; and सबळ to be f, and to mean Crowbar.

संबळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A musical instrument of the tabor kind.

संबळ     

पुस्त्री . १ तोंडाशीं दुभागलेली मोठी पहार ; सामान्यतः पहार . २ तोमर ; छेळणें ; भाल्यासारखें एक शस्त्र . कांहीच्या मतें संबळ हा शब्द पुल्लिंगी असून फक्त मोठी पहार हा अर्थ दाखवितो व सबळ हा स्त्रीलिंगी असून दुधारी पहार किंवा छेळणें दाखवितो . कौतुकें जें जें जल्पे । तें सबळाहूनि तीख रुपे । - ज्ञा १३ . ६६२ . [ स + बल ]
संबळी , संबळ्या पहा .
 स्त्री. शिदोरी ; अन्नसामुग्री . आणि प्रिय आलिया स्वभावें । सबळ उरे वेचें ठाउवें नव्हे । - ज्ञा १८ . ५९१ .
 पु. गोंधळी वगैरेंचें एक मृदंगासारखें वाद्य . याचे दोन भाग असतात - एक पडगा किंवा पडगी अथवा झील . हें लहान असून खालचा स्वर काढतें . संबळया - पु . संबळ वाजविणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP