|
स्त्री. १ धांव ; दौड ; शर्यत ; पळ . ( क्रि० मारणे ; ठोकणे ). थाट चाले गाई गोपाळांची धूम । पुढे कृष्ण राम तया सोयी । - तुगा ३२ . २ . ( ल . ) उत्सुकता ; धाडस ; धैर्य ; साहस . ३ चैन ; चंगळ ; रेलचेल ; अतिशयता ( हा शब्द फार व्यापक अर्थाने वापरतात . ) आंब्याची - लाडवांची - तुपाची - उदमाची - धूम . पावसाने धूम केली . पेंढार्यांनी मुलखांत धूम मांडली . क्षणभर पंतोजी गेला म्हणजे पोरे धूम मांडतात . दरोड्याची अथवा चोरांची धूम . पाहुण्यांची धूम . गाण्याची - नाचण्याची - खेळण्याची - धूम . ४ हल्ला ; गर्दी . एकदम हत्यारे उपसून आमच्यावर धूम केली . वज्राघात ९७ . ५ संहार ; बंडाळी ; दंगा ; गोंधळ ; गर्दी ; गडबड . हरि करिकुळी परबळी करि तो अतुल प्रभाव कवि धूम । - मोशल्य २ . ५० . - क्रिवि . कडाक्याने ; झपाट्याने ; तल्लखीने ; जोराने ; कांही विचार न करतां . पाऊस धूम पडतो . धूम काम चालले . जरीमरीने धूम माणसे मरुं लागली . तो धूम लोकांस मारतो - तोडतो - शिव्या देतो . धूम फौज पळाली - घोडा निघाला - तोफा सुटल्या . [ हिं . ] स्त्री. ( कु . ) मळणीच्या वेळी खांब्यांत दावण अडकविण्यासाठी एका वाटोळे विणलेले वेलीचे कडे . स्त्री. १ गाण्यांत पखवाज , मृदंग , संबळ इ० कांच निघणारा खर्ज सूर ; असा सूर निघण्याचे स्थान ; वाद्याचा असा अवयव . धुमा पहा . २ गर्जना ( तोफांची , सिंहाची ). [ ध्व . ] पु. धूर ; वाफ . तोय तेज धुमू । ययां वायूसी संगमू । - ज्ञा १८ . ३०८ . [ सं . धूम ; ग्री . थूमॉस ; लॅ . फ्यूमुस ; प्राज . दौम , तौम ; लिथु . दुमै ; स्ला . दमू ; हिब्रयू , धुलुइम्ह = ढग ] ०ठोकणे पळ काढणे ; सूं बाल्या करणे . ०केतु पु. शेंडे नक्षत्र . गगनी उगवले त्रिविध केतु । दंडकेतू धूमकेतू । - एभा ३० . ५९ . [ सं . ] ०पाहणे पाणी , बल पाखरणे ; कसोटीस लावणे ( आटोप , मर्यादा , शक्ति , धाडस इ० ). एका धुमावरचा ( गांव इ० ) - एका धांवेच्या अंतरावर असलेला . ०धडक क्रिवि . धीटपणाने ; झपाट्याने ; सपाट्याने ; तडाख्याने ; रगडून ; कचकावून ( जाणे , करणे , बोलणे ). ०धडाका खा पु . १ झपाट्याचा , जोराचा , सपाट्याचा , तडाख्याचा , व्यापार , कार्य . प्रपंच अवघा धूमधडाका । - टिक १७५ . २ ( सामा . ) ओरडणे ; दणदणणे ; गर्जना करणे ; एखादा मोठा गलबला ; गंभीर घुमणारा आवाज , गोंगाट . ( क्रि० करणे ; लावणे ; मांडणे ; चालणे ; लागणे ). तोफांचा धूमधडाका ०धाम स्त्री. धामधूम ; गडबड ; आरडाओरड - घाको १८३ . [ हिं . ] ०योनि पु. मेघ .
|