Dictionaries | References

शिंग

   
Script: Devanagari

शिंग

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   manfully; to battle with; furcâ expellere. Ex. आलें अंगावर घेतलें शिंगावर. शिंगें मोडून वासरांत शिरणें To behave or act childishly. 2 To conceal one's knowledge and simulate the simplicity of childhood.

शिंग

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A horn; a cornet.
शिंगावर घेणें   oppose (an evil) manfully. Ex.
आलें अंगावर घेतलें शिंगावर. शिंगे मोडूण वासरांत शिरणें   To behave or act childishly. To conceal one's knowledge and simulate the simplicity of childhood.

शिंग

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  जनावरांच्या डोक्यावरील एक टोकदार गात्र   Ex. पोळ्याच्या सणाला बैलाच्या शिंगांना चमकी लावून सजवतात
HYPONYMY:
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasہٮ۪نٛگ , سِنٛگ
malമൃഗത്തിന്റെ കൊമ്പു്‌
mniꯃꯆꯤ
urdسینگ , شاخ حیوان
 noun  शिंगाच्या आकाराचे तोंडाने वाजविण्याचे एक वाद्य   Ex. शिंगे वाजविल्याचा आवाज दूरवर ऐकू जातो.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  फुंकून वाजवले जाणारे वाद्य   Ex. तो शिंग वाजवत आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : तुतारी

शिंग

  न. शृंग ; विषाण ; जनावराच्या डोक्यावरील एक अणकुचीदार गात्र . २ या आकाराचें एक वाद्य ; कर्णा . [ सं . शृंग ; प्रा . सिङ्‍ग ; गु . हिं . सींग ; बं . उरिया शिंग ; फ्रेंजि . शिंग ] म्ह०आलें अंगावर घेतलें शिंगावर . २ म्हशीचीं शिंगें म्हशीस जड नसतात . स्वतःच्या गोष्टीचें किंवा स्वकीयांचें कोणास ओझें वाटत नसतें . ३ शिग्यांक तारूं गाबत्याक गोरूं . ( गो . ) शिंग वाजविणार्‍याला जर तारूं दिलें व गाबत्याला जनावर ( गुरूं ) दिलें तर त्याचा कांहीं उपयोग होत नाहीं . ( वाप्र . ) शिंगें असणें - भेद असणें . ( मनुष्य आणि पशु यांत ठळक भेद शिंग म्हणून ). दहा वाजण्याला कांहीं शिंगें आहेत काय ? . शिंगें फुटणें - वेडेपणा , अति शहाणपणा करणें . शिंगें मोडून वासरांत शिरणें - १ जाणत्या माणसानें पोरकटपणा करूं लागणें . २ अज्ञपणाचें ढोंग करणें ; शहाणपण दडवून मुलांप्रमाणें मूढ बनणें . शिंगावर घेणें - टक्कर घेणें ; चांगलें तोंड देणें ; लढणें . शिंगट - न . १ ( तिरस्कारार्थी ) शिंग ; शिंगाचा तुकडा ; मेलेल्या जनावराचें शिंग . मणी होता शिंगटाचा । लोभ धरूनिया तयाचा । मूर्खपणें राज्याचा । अव्हेर केला । - दा ५ . ६ . ६२ . २ बंदुकीच्या दारूनें भरलेलें शिंग . ( दारू उडविण्याकरितां ). शिंगटणें , शिंगाटणें - क्रि . १ शिंगानें मारणें ; शिंगावर घेऊन फेकणें . २ ( ल . ) अतिशय रागें भरणें ; खरडपट्टी काढणें . ३ ( ल . ) ठकविणें ; फसविणें . शिंगडा , शिंगाडा - पु . १ पाण्यांतील एक वेल , व तिचें फळ . २ गोडया पाण्यांतील एक मासा . ३ बंदुकीची दारू भरून ठेवण्याचें शिंग ; दारू ठेवण्याचें पात्र . मुलानें कंबरेस दारूचा शिंगाडा बांधला होता त्यास आग लागली . - तीप्र १३६ . ४ एक प्रकारची ऐरण , साधी आणि संदान ह्याहून जरा निराळी . खिळे व भांडीं घडावयाची . ५ खणाची त्रिकोणी घडी . ६ शिंगांच्या आकाराचें खुंटाळें . [ सं . शृंगाटक , संघाटिका ] शिंगडें - न . बैलाच्या शिंगावरील एक दागिना . र्शिगदोरी - स्त्री . मध्यें घुंगुर घालून शिंगाभोंवतीं बांधलेली दोरी . शिंगशिंगोटी - स्त्री . १ जनावरांचीं शिंगें , हाडें इ० ( मेलेलीं जनावरें टाकतात त्या जागेवरचीं ); गुराढोरांचीं पडलेली शिंगें , हाडें इ० . २ ( व्यापकपणें ) शिंगें असलेलें जनावर , पशु . ३ शिंगाडया जनावरांच्या विक्रीवरची सरकारी पट्टी ; शृंगादाय . - राव्यको . शिंगाटणें - न . बैलाच्या शिंगदोरीला बांधलेला हस्तीदंताचा तुकडा . शिंगाडा , शिंगाडी , शिंगाडया - पु . शिंग फुंकणारा , वाजविणारा . - वि . मोठया व लांबलचक शिंगाचा . र्शिगाडा वेल - पु . शिंगाच्या आकाराची वेलबुट्टी . शिंगाडी - स्त्री . १ शिंगाडयाचा वेल . २ गाडीच्या पुढें असणारे उभे दांडे . ३ जोडा सैल करण्याकरितां चांभार वापरतात तें शिंगासारखें हत्यार . शिंगाडें - न . पोळयाच्या दिवशीं बैलाला तेल पाजण्यासाठीं , भोंक पाडलेलें शिंग वापरतात तें . शिंगाळ - वि . १ लांब शिंगें असलेलें . २ मारकट ; शिंगें मारणारा ( बैल ). ३ ( ल . ) आसपासच्या सर्व माणसांना त्रास देणारा किंवा त्यांच्या खोडया करणारा उपद्रवी इसम . शिंगाळणें - क्रि . शिंगानें मारणें ; शिंगाटणें . शिंगाळू - वि . १ शिंगें फुटूं लागलेला ( बकरा , मेंढा , काळवीट इ० ). २ मारकट ; शिंगांवर घेणारा . ३ मोठया व लांबट शिंगांचा . शिंगाळें - न . ( जनावराला धरण्यासाठीं त्याच्या ) शिंगांच्याभोंवतीं बांधलेली दोरी . शिंगाळें केळें , शिंगाळी केळ - न . एक जातीचें केळें . शिंगाळया - वि . मोठया किंवा लांबलचक शिंगांचा . शिंगी - स्त्री . १ वाजवण्याचें लहान शिंग ( कानफाटया गोसाव्याचें ). २ लहान शिंगरूं ( मादी ) अल्पवयस्क घोडी . शिंगोटी - स्त्री . १ जनावराच्या शिंगाबद्दल अल्पार्थक शब्द . शिंगट . २ ( समुच्चयार्थी ) शिंगांचीं जनावरें . ३ ( सामा . ) शिंगाचें जनावर . दोन शिंगोटया होत्या त्याही सरकारांत नेल्या . ४ शिंगांचें जनावर विकणार्‍यापासून घ्यावयाचा कर . ५ बैलाच्या शिंगाला बांधलेली दोरी ; शिंगाळें . म्ह० शिंग . तिकडे शिंगोटी - शिंगाचें जनावर म्हटले कीं सरकारी कर आलाच . [ हिं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP