Dictionaries | References

कोल्हे

   
Script: Devanagari
See also:  कोल्हा , कोल्हें , कोल्हेल

कोल्हे     

 न. भोपळाच्या आकाराचा बियानें ठेवण्याचा भाताण्याचा ( पेंढ्याचा ) मुडा , भांडे . ( का . कोळवी = तेल इ० ठेवण्याचा नळा .)
पुन . १ कुत्र्याच्या वर्गातील प्राणी . हा भुर्‍या वर्णाचा व मऊ केसांचा असुन रात्रीचा हिंडतो . याला द्राक्षें वगैरें फळें आवडतात . कर्कशक ओरडणारा , फार धुर्त पण भित्रा . जंबूक ;' शृगाल .' कीं कोल्हेया चांदणी । आवडी उर्पजें । ' - ज्ञा . ४ . २३ . २ ( ल .) धूर्त माणुस , चोरटा माणुस . ( दे . प्रा . कोल्हअ ) म्ह० १ अडलें कोल्हें मंगळ गाय = संकटांत सांपडलेला दुष्ट मनुष्यांहि संकटात घालणाराची स्तुति करतो . तुल० अडलानारायण गाढवाचें पाय धरी . २ एक कोल्हं सतरा ठिकाणी व्यालं . ३ कोल्हं काकडील राजी = ज्या वस्तुवर आपल्या मुळींच हक्क नाहीं ती आपणांस अगदीं थोडी मिळाली तरी क्षुद्र माणुस खुष होतो . अल्पसंतोषी . ( वाप्र .) काल्हाकोल्हाचें लग्न - ऊन असतांना पाऊस पडुं लागला असतां म्हणतात . कोल्हाचेंतोंड बघणें - नागवें कोल्हें भेटणें - शुभ्र शकुन घडणें अकल्पित मोठा लाभ होणें . कोल्ह्यांचें शिंग -( गो .) सशाचें शिंग . ( ल .) अशक्य गोष्ट साध्य होणें ; वशीकरणकला अवगत असणें . ( पुढील समासांतील पहिलें पद ' कोल्हें ' आहे )
०कुई  स्त्री. कोल्ह्यांची आरडाओरड ; हुकी ( ल .) क्षुद्र लोकांची निरर्थक विरुद्ध बडबड ; क्षुद्र अडथळा . ' बाहेरच्या जगाला विसरून ... जगाची कर्कश कोल्हेकुई कोण ऐकत बसणार ? ' प्रेमसंन्यास
०टेंकण   णें - न . ( विशेषत ; चतुर्थी विभक्तीत बसणें , किंवा येणें बरोबर उपयोग ). कोल्हें टेकण्यास बसणें - कोल्याप्रमाणें दबकून बसणे . कोल्हें टेकण्यास येणें - १ वयांमुळें अशक्तता प्राप्त होणे . २ मावळण्यास येणें ( सुर्य दिवस ) कोल्हा मागल्या पायावर बसला असतां जमीनीपासुन जितक्या उंचीवर असतो तितक्या उंचीवर सुर्य मावळतांना क्षितीजापासुन असला म्हणजे म्हणतात .
०भूंक   भोंक - स्त्री . १ कोल्हाची हुकी ओरडा ; कोल्हेकुई . २ मोठी पहांट ; प्रभांत ( कोल्हें + भुंकणें )
०शाही    ) - स्त्री . लुच्चेगिरी . ' असला कोल्हेशाई प्रश्नं कशाला ? ' टि १ . २६ .
   ) - स्त्री . लुच्चेगिरी . ' असला कोल्हेशाई प्रश्नं कशाला ? ' टि १ . २६ .
०हुक  स्त्री. १ कोल्हांची हुकी ; कोल्हेकुई २ ( ल .) मोठमोठ्यानें ओरडून हल्ला करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP