Dictionaries | References

मेंढरुं

   
Script: Devanagari

मेंढरुं     

 न. मेंढें ; मेंढीचें पिलूं . [ मेंढा ] म्ह० मेलें मेंढरुं आगीला भिईल काय ? मेंढरांची दावण देवास देणें - देवाला मेंढरांची माळका एकदम बळी देणें . मेंढमाळ - स्त्री . मेंढ्यांची रांग . मेंढरु चेंढरुं - न . मेंढरुं व त्यासारखें दुसरें क्षुद्र जनावर . [ मेंढरुं द्वि . ] मेंढवाडा - पु .
रात्रीच्या वेळीं जेथें मेंढ्या कोंडून ठेवतात तें घर , जागा .
( ल . ) मेंढरांचा कळप , जमाव . मेढशिंगी - स्त्री . मेंढ्याच्या शिंगाच्या आकाराचीं फळें असलेली दुधाळ व कांटेरी वनस्पति ; काकडशिंगी . हिचा नेत्रौषधांत उपयोग करतात . [ सं . मेषशृंगी . मेंढा + शिंग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP