|
स्त्री. वर्तन ; वागणूक ; राहाणी . जीवन ; आयुष्यक्रम ; दिवस कंठणे . तो काय दुष्ट राजा हो ! त्याचे हाताखाली प्रजांची वर्तणूक होणे कठीण दिसते . [ वर्तणे ] ०जामिनी स्त्री. पंचायतीच्या निकालाप्रमाणे वागतील अशी वादांतील पक्षाच्या स्नेहमंडळीने दिलेली हमी , जामिनकी . वर्तणे अक्रि . वागणे ; आचरण करणे . - ज्ञा ४ . ९३ ; पुत्र वर्ते पितृआज्ञेने । राहणे ; असणे ( आंत , वर , कडे ). नृप चित्र चित्रसेन व्यूहाच्या सबळ वर्तती पृच्छी । - मोकर्ण ७ . ४६ . अमलांत असणे ; चालू , रुढ असणे ( चाल , विधि ). ( काव्यांत ) घडणे ; होणे - ज्ञा १ . १३७ . एकचि वर्तली चिंता । - ऐपो ४१ . [ सं . वृत ] वर्तन - न . वागणूक ; आचरण . नव्हे आणि वर्तन । ऐसे पै ते । - ज्ञा १३ . ३५६ . राहाणे ; नांदणे ; अस्तित्व . धंदा ; व्यवसाय ; उपजीविकेचे साधन . यज्ञा ऐसे वर्तन । जीविके केले । - ज्ञा १७ . ३३९ . [ सं . ] वर्तनीय - वि . ( एखाद्या कामाधंद्याला ) लावण्याजोगा ; कामांत गुंतविण्याजोगा . वर्तवणे , वर्तविणे - उक्रि . वर्तणेचे प्रयोजक रुप . ( ज्यो . ) गणित करुन निश्चित करणे ( ग्रहण , संक्रांति इ० ). ( खलांत तपकीर इ० ) घोटणे . वर्तित - वि . चालविलेले ; वर्तविलेले ; व्यवस्था केलेले . [ सं . ] वर्ती - वि . राहणारा ; असणारा ; वर्तणारा . उदा० अग्रवर्ती , मध्यवर्ती , पुरोवर्ती इ०
|