Dictionaries | References

जुगणें

   
Script: Devanagari

जुगणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To join or unite parts or pieces. 2 fig. To agree, answer, meet, suit--persons, measures, materials. 3 To come to an understanding or reconciliation--chafferers, disputers, enemies. 4 To correspond or consist harmoniously--parts of a poem &c. 5 To be joined in sexual congress. 6 To come together in the same cell or square--सोंगट्या.

जुगणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   join parts or pieces. fig. agree, answer, meet, suit-persons, measures materials. come to an understanding or reconciliation-disputers, enemies. come together in the same cell or square-सोंगट्या.

जुगणें

   अक्रि . १ भाग , तुकडे जोडणें , जुळविणें . २ ( ल . ) जमणें ; मिलाफ होणें ; एकमत होणें ; सिध्दयनुकूल परस्पर सुसंगत होणें ( दोन माणसांचे विचार , उपाय , पदार्थ ). एक बैल पडला तापट , दुसरा पडला मठ्ठ यामुळें नांगराचे कामास दोघांचें जुगत नाहीं . ३ समजूत पटणें ; सख्य होणें ; तडजोड होणें ( शत्रु , वादी ; प्रतिवादी यांची ). ४ मिलाफ बसणें ; परस्पर जमणें ; जुळणें ; अनुरूप घटना होणें ( काव्याचे चरण इ . कांची ). आम्ही कापड घेणार होतों परंतु कापडकर्‍याचें आमचें जुगत नाही . ५ संभोगार्थ स्त्रीपुरुषांनीं एकवटणें . ६ अनेक सोंगटया एका घरांत येणें . [ सं . युग ] जुगल - स्त्री . १ जमाव ; समूह . २ सख्य ; मिलाफ ; एकतानता ( वाद्यें , उपाय यांची ). या मृदंग्याची आणि गवयाची जुगल चांगली होते . ३ सामना ; बरोबरी . ४ जोडीनें गाणें ; खेळणें ; दुसर्‍यांशीं आपलें जमविणें ; साथ ; एकमेकांचा संयोग . याला पुढें तसें गातां येत नाहीं पण मागून सूर देण्याविषयीं जुगल चांगली करितो . ५ एकत्र केलेलें खलबत ; मसलत . ६ ( सामा . ) जूग ; जूट ; जोडी . [ सं . युगल ; प्रा . जुगल ] जुगविणें - १ एकत्र जोडणें ; संयोग करणें . २ मेळ बसविणें ; एक मिलाफ करणें . ३ सख्य करून देणें ; मैत्री करविणें . [ जुगणें प्रयोजक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP