|
उ.क्रि. १ ( पळीनें , दांडयानें , चमच्यानें इ० ) ठेंचणें , चेंचणें , घोंटणें ; ढवळणें . तुज लाविलें स्वतेजें म्यांच कढी - भात - वरण घाटाया । - मोगदा २ . १६ . २ आघात , प्रहार करणें ; घावटणें ; बडवणें ; ठोकणें ; ताडण करणें . कीं तयाही पाठीं । जे वेळीं लोह मांसातें घांटी । ते वेळीं विजयश्रियेच्या पाटीं । एकुचि बैसें ॥ - ज्ञा ७ . १२ . ३ ( ल . ) त्रास देणें ; गांजणें ; सतावणें ; बेजार करणें ; छळणॆं ; जाचणें ; कतरओढ करणें . ४ चर्चा , खल , वाटाघाट करणें ; ( विषय गोष्ट ) घोळणें . पंधरा दिवस तें लग्न घाटत होतें पण सिध्दीस गेलें नाहीं . ५ ( सामा . ) एकजीव करणें ; मिळविणें . [ सं . घट्ट , घट्टन ; प्रा . घट्टण ; बं . घाँटा = ढवळणें ] घाटून वाटून - क्रिवि . १ घोटून आणि पिष्ट करून . ( क्रि० खाणें ; पिणें ; गिळणें ) ( प्र . ) वाटून घाटून . वाटणें पहा . न. १ घाटण्याकरितां ज्याचा उपयोग करतात तो दांडू , चमचा , पळी ; घाटणा ; घाटणेरा ; ढवळण्याचें साधन . २ घाटण्याची , घोटण्याची , ढवळण्याची क्रिया . ३ ( खा . कुंभारी ) मडक्याचें बूड घासण्याचें लांकडी हत्यार , साधन , उपकरण . [ घाटणें ]
|