Dictionaries | References

गिळणें

   
Script: Devanagari

गिळणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

गिळणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Swallow. Absorb. Embezzle. Suppress, smother, stifle (anger, grief, &c.). Put up with, swallow or stomach (an injury or affront).

गिळणें     

उ.क्रि.  १ गट्ट करणें ; गळयाखालीं उतरविणें मला कोरडा भात गिळत नाहीं , कालवण असेल तर गिळेल . २ ( ल . ) शोधून घेणें ; खाऊन टाकणें ( पारा सोनें शोषतो , भाकर तूप शोधून घेते त्याप्रमाणें ). ३ ( ढग , राहू इ० नीं ) ग्रासणें ; व्यापणें ; घेरणें . गौतमपत्नी गिळिली होती जे पापतापशापाहीं . - भक्तमयूर केका ४ . ४ लांच खाणें . ५ दाबणें ; दडपणें ; आंत कोंडणें ; आंतल्याआंत चेपणें ( अश्रु , राग , दु : ख ). ६ अपकार , अपमान , अपराध ). सहन करणें ; पोटांत घालणें ; प्रतिकार न करणें . त्यानें त्याला एवढया शिव्या दिल्या परंतु त्यानें गिळिल्या . [ सं . गल + गिळणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP