|
पु. कुनबावा करणारा ; शेती करणार्या जातीपैकीं एक ; शेतकरी ; शेतीचा धंदा करणारा . म्ह० १ कुणबी इळ्या इतका उजू . २ कुणबी मेला भुतानें , बामण मेला वातानें सोनार मेला पित्तानें . ३ कुणब्यासा रिखा दाता नाहीं , कुटल्यावांचुन देत नाहीं . ४ कुणबी सारिखा दाता नाहीं और मारे बिगर देता नहीं . ( सं . कुलपति , कुळंबी , कुणबी ) ०दोक वि. ( शुद्रोदक या संस्कृत शब्दांच्या अनुरोधानें बनविलेला शब्द ) = कुणब्यानें आणलेलें , स्पर्श केलेलें उपयोग केलेलें ( पाणी , भांडें , कोणतीहि वस्तु .) ( कुणबी + उदक ) ०माळी पु. शेती करणार्या सर्वसामान्य लोकांसंबंधी शब्द ;' शेतकरी लोक ; खेड्यांतील लोक . ०हिंशेब पु. कुणबाऊ हिशेब खेडबळ , हेंगाडा , ठोकळ पद्धतीनें केलेला हिशेब ( खड्यांनी , बोटें घालुन इ० केलेला )
|