Dictionaries | References

फिरस्त्यांतील तळाचा नाईक व मैना

   
Script: Devanagari

फिरस्त्यांतील तळाचा नाईक व मैना     

फिरस्ते निरनिराळया वाटांनीं शेतांत घुसतात. एकाला घालवावयाला कुणबी आला कीं दुसर्‍यांनीं गर्दी करावयाची यामुळे सर्व त्याला घेरुन गोंधळून सोडतात. तळाचा नाईक मैना घेऊन थोरलें मुंडासें घालून कुणब्यास रामराम करतो. बायका पुरुष यांना कणसें तोडतांना पाहून कुणबी रागावतो
परंतु मोठा दैवाचा बळिराजा ! धर्माचा वांटा दे इत्यादि गुळचट भाषणें करुन नाईक खुलवितो व मैना गळयांत हात घालून दाढीला हात लावून पोवाडे इप्किबाज गाणीं, उखाणे, म्हणून थट्टा करतो. एवढया अवधींत इतरांचा डाव साधतो वर नाईकाची भिक्षा, मैनेची ओवाळणी निराळीच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP