Dictionaries | References

कुणबी मेला भुतानें, ब्राह्मण मेला वातानें

   
Script: Devanagari

कुणबी मेला भुतानें, ब्राह्मण मेला वातानें

   (आणि सोनार मेला पित्तानें )
   कुणबी मेला असतां त्‍याला एखाद्या भुताने झपाटले असले पाहिजे अशी त्‍याच्या आप्तइष्‍टांची समजूत असते व तो आजारी असतां अशाच प्रकारचे अंगारा, धुपारा, कौल, भगत वगैरे उपचार तो करीत असतो. ब्राह्मण मेला असतां त्‍यास कोणता तरी रोग वात वगैरे झाला असला पाहिजे अशी त्‍याच्या आप्तेष्‍टांची समजूत असते व त्‍यासहि फार खाल्‍ल्‍यामुळे अजीर्ण होण्याचा संभव असतो. सोनार सारखा शेगडीशी बसून उशीरपर्यंत काम करीत राहिल्‍यानें त्‍यास पित्त होण्याचा नेहमी संभव असतो. असा कुणबी हाट्या, वाटेवर लावी कांट्या असा पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP