|
वि. स्त्रीपु . मृत ; मेलेला ( मनुष्य ); स्त्रिया आपली खोडी काढणार्या , आपणांस दुखविणार्या पुरुषासंबंधीं तिरस्कारार्थी हा शब्द नेहमीं वापरतात . मेळा ; यात्रा . मेळा पहा . [ सं . मिल ; हिं . मिला ] मेलिकार , मेलीकार , मेल्लिकार - पु ( महानु . ) मुरदाड ; निकस ; बेचव ; शिळा ; निर्जीव , नीरस . इ० अर्थी अनेक नामांशीं योजतात . जसें - मेला चुना = मळणींत वापरलेला , बांधकामांत योजलेला , विरी गेलेला चुना . मेली भाकर = चाकरी किंवा मेहनत न करितां मिळालेलें अन्न . मेलें अन्न पहा . मेली माती = बांधकामांत एकदां उपयोगिलेली , रुक्ष , निःस्नेह , चिकटपणा न धरणारी माती ; कुजलेली माती ; क्षारपुटाची माती . मेलें अन्न = श्रम न करितां अगांतुकी करुन किंवा शास्त्रविहित नसतां भिक्षा मागण्याच्या निंद्य मार्गानें मिळविलेलें अन्न . ( क्रि० खाणें ). मेलें कातडें = निर्जीव कातडें . मेलें काम = एखादें निरुत्साही काम ; मनाला उत्तेजन किंवा व्यायान न देणारें , नुसत्या मजुरीचें काम . मेलें तूप = योग्य तो खर्च करुन किंवा उपयोग केल्यानंतर अवशेष राहिलेलें तूप . मेलें तेल = खर्च न होतां राहणारें तेल ( दिव्याचें दिपुष्टेल ); तळण्यांतील राहिलेलें शिळें तेल . मेलें नख = मृत , रुक्ष , अळंब्यासारखें नख . मेलें पाणी = कढविल्यानें किंवा तापविल्यानें त्यांतील वायु निघून गेला आहे असें पाणी ; बेचव , निर्जीव पाणी . एकदां उपयोग केलेलें पाणी . मेलें मांस = मृत मांस , जखमेंतील अळंब्यासारखी वृद्धि . मेलें रक्त = १ मृत , नाडिबहिर्भूत रक्त . वसति ; छावणी . पातले पवनवेगें जेथ मेलिकारु केला श्रीकृष्णराये । - धवळे पू २६ . पडलेलें रक्त , गोठलेलें रक्त . समुदाय ; जमाव . मेलीकारे नाचती सुभद्रेचे गानीं । - धवळे उ . २४ . मेलेकरी - पु . मेळ्यांतील मनुष्य . अर्धवट चलन पावणारें , मृत रक्त ( जसें , म्हतार्या माणसाचें ). मेलें राज्य = नष्ट राज्य , सत्ता . मेलें लिहिणें = मनाला आंल्हाद न देणारें लिहिण्याचें काम ; नुसतें नकल करण्याचें काम . मेलें हत्या ( तें ) र = निकामी धार नसलेलें , गंजलेलें , वापरांत नसलेलें हत्यार ; कितीहि चांगली व्यवस्था असली तरी गोळी उडण्यास चुकणारी बंदूक , तोड्याची बंदूक , तोफ इ० याच्या उलट जिवंत हत्यार ; चालू हत्यार . [ सं . मृत ; प्रा . मइल्ल ] ( वाप्र . ) मेला मुर्दा उकरणें - उखाळ्यापाखाळ्या काढणें ; विसरलेलें भांडण , वैर उकरुन काढणें . मेल्याचा पाड चढणें , जाणें - प्रेताच्या किंमतीचें होणें ; सर्व किंमत गमावणें मेल्या आईचें दूध प्यालेला असणें - निर्बळ , निर्जीव , नेभळा असणें . मेल्याच्या मागें कोणी मरत नाहीं - दुसरा मेला म्हणून कोणी स्वतां मरत नाहीं ; तोटा , नुकसान झालें असतां कोणी आपला जीव देत नाहीं . मेल्याचें तळपट हो - ( बायकी शिवी ) दुष्टांचा सर्व नाश होवो . कृष्णा हि म्हणे मेल्या अक्षकरांचें समूळ तळपट हो । - मोविराट ६ . ७८ . ( वाप्र . ) मेल्या तुझी रांड हो - तुझी बायको रांड ( विधवा ) होवो . म्हणजे तूं लवकर मृत्यु पावोस . मेल्या ! रांड तुझी हो ऐसें शापी हळूच कु त्यातें । - मोवन १२ . ५८ . मेल्यापेक्षां मेला होणें - अतिशय खजिल होणें . मेल्ल्या सारीर वडे भाजून खाणारी - ( गो . ) चितेवर भाकरी भाजून खाणारा , उलट्या काळजाचा मनुष्य सामाशब्द - मेलतोंड्या - वि . मेमलतोंड्या ; गायतोंड्या ; लाजाळु मुखदुर्बळ . [ मेला + तोंड ] मेलेला - वि . मृत ; निर्जीव . बुडालेलें ; डुबलेलें ( कर्ज ). याच्या उलट जिवंत किंवा जिता . [ मरणें ] मेलेली सोंगटी बसविणें , सोंगटी लागणें - ( तिफाशी सोंगट्यांचा खेळ ) डावांत प्रतिपक्ष्यानें मारलेली सोंगटी पुनः डावांत खेळण्यास घेणें . अशी सोंगटी लागण्यास किंवा बसविण्यास नऊच्या पुढील दान पडावें लागतें . मेलेली सोंगटी बसेपर्यंत दुसरें दान देतां येत नाहीं . मेलेलें अन्न - न . मेलें अन्न . कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नाहीं , मेलेलें अन्न खाण्याची हौस हे प्रकार चोहोंकडे माजलेले आहेत . - के .
|