Dictionaries | References

कांडी

   
Script: Devanagari

कांडी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : बिस्कूत

कांडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. कांडी फिरविणें or -पिरगाळणें To use his wand; to pass it around his left arm &c.--a conjuror in crying Presto.

कांडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A short piece. A shoot of the root (of sugar-cane &c.).
कांडी फिरविणें   To use his wand; to pass it around his left arm &c.-a conjurer.

कांडी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : पाकळी

कांडी     

 स्त्री. १ मिठागर ; खांचर . २ कुंडी , कोंडी पहा .
 स्त्री. १ वेखंड , सुंठ आले , हळद इ . ची मुळें व तुकडा ; मोड ; अंकुर ; ऊसं वगैरेची पेरें . २ त्या आकाराचा धातूचा लांबट तुकडा . ३ वस्त्र विणण्यासाठीं ज्या काडीला सूत गुंडाळलेलें असतें तीं काडी . ४ ( विणकाम ) घोड्याच्या आंतील दोर्‍याचें गुंडाळें बाबीण ; घोठ्यामध्यें बसेल अशा लांकडी अगर बोरुच्या तुकड्यावर भरलेल्या सुताची गुडाळी . ५ लसणीचा गट्ठा . ६ ( गो .) चंदनाचें खोड . ' गंधा कांडी बरी वासाची आसा .' ७ ( कों . नाविक ) दोन्हीं रोजांस सांधणारे व दोन्ही रोजांसहित भागाचें लांकुड हा गलवताचा पाया होय . या लांकडास वरच्या अंगासा दोन्हीं बाजूंस खांचा पाडून त्यांत फळ्या बसवितात . ८ ( छापखाना ) फर्मा ठोकतांना पान ( पेज ) व समान ( फर्निचर ) हें चौकटीला आंवळून बसण्याकरितां ठोकावयाचा लांकडाचा तुकडा . ( सं . कांड ) - चे लांकूड - घोट्यांतील सूत ज्या बोरूच्या कांडीवर गुंडाळतात ती , गन्या .
०पिरगाळणें   फिरविणें - गारुडी आपल्या हातांतील लांकडाची फिरवितो ती . ( यक्षिणीची ) कांडी फिरविणें - चमत्कार घडवून आणणें , अवचित एकादी गोष्ट घडवून पूर्वी घडलेल्या कृत्याच्या उलट घडून येणें .

कांडी     

कांडीकर्मल एक जालें, आंवाळो गडगडलों
(गो.) अळवाची देठी आणि तिचा खाजरेपणा नाहीसा करणारे कर्मल नांवाचे फळ ही दोन्ही एक (शिजून एकजीव) झाली आणि आंवळा मात्र बाजूला गडगडून गेला. आपापसांत भांडणारे नातेवाईक कालांतराने एक होतात. आणि त्‍यांची बाजू घेऊन भांडणारा किंवा कलागत लावणारा तिर्‍हाईत इसम तोंडघशी पडतो.
(जादूची) कांडी पिरगाळणें-फिरवणें
जादुगार आपली जादूची कांडी आपल्‍या डाव्या हाताभोंवती वगैरे फिरवतो. त्‍यावरून जादू करणें
काहीतरी छांछ्‌ मंत्रतंत्र, जादूटोणा करणें
चमत्‍कार दाखविणें. पुढे पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP