|
पु. १ एक फुलझाड . हें झाड सरळ वाढतें . याचीं पानें सुंदर असून झाडाच्या सर्वांगांस कांटे असतात . फुलाचा रंग तांबडा , गुलाबी , पिंवळा , पांढरा असतो . फुलांपासून अत्तर काढतात व गुलकंद तयार करतात . २ त्याचें फूल . ३ गुलाबपाणी व अत्तर . गुलाबशिसे उत्तमसे तीन चार पाठविलेत तर बरें होतें . - ब्रच २५३ . [ फा . गुल = फूल + आब = पाणी ; हिं . गुलाब = गुलाबाचें फूल ] ०कंद पु. गुलकंद . गुलाबकंद वजन पक्के एक शेर पाठविल तो घेणें . - ब्रच १२९ . ०कळी स्त्री. गुलाबाची कळी ; ही औषधी असते . ०चक्री छकडी - स्त्री . साखरेच्या पाकांतील गुलाबाची मिठाई . ०छकडी स्त्री. १ चटकचांदणी स्त्रे ; एक प्रकारचें गाणें . ०छडी पु. खडीसाखरेची कांडी . ०जांब जामून - पुन . मैद्यामध्यें तूप व खवा मिसळून तुपांत तळून आणि नंतर जिलबीसारखी पाकांत मुरत टाकून केलेली मिठाई . - गृशि १ . ४३६ . [ फा . गुलाबजामन = एक फळ ] ०दान दाणी - नस्त्री . गुलाबपाणी ठेवण्याची व तें शिंपडण्याची झारी . [ फा . गुलाब्दान ] गुलाबदान - पु . द्राक्षाची ( पांढर्या रंगाच्या ) एक जात . - कृषि ५१२ . ०पाणी न. गुलाबाच्या फुलापासून तयार केलेलें सुगंधी पाणी . हें पानसुपारीच्या वेळीं अंगावर शिंपडतात . ०पाश पु. गुलाबदाणी . [ फा . ] ०शकर स्त्री. गुलाबपाक . गुलाब - शकरीच्या वडया सुमार पन्नास पाठविल्या त्या पावल्या . - ख १२ . ६६३६ . ०शेवतें न. ( गों . ) सोन्याचें गुलाबाचें फूल ; एक दागिना . गुलाबाचें फूल - न . गुलाब . २ गुलजार . ३ ( ल . ) नाजूक स्त्री , मूल . बाईसाहेब , हें ऊन फार कडक आहे बरें ... आपण आपलें हें गुलाबाचें फूल घरांत नेऊन जपून ठेवा . - त्राटिका . गुलाबी - स्त्री . १ ( कोल्हाटी , डोंबारी ) दोरावर काम करणारी मुलगी , हिला लाडकें नांव . २ एक लहान झुडूप . - वि . गुलाबविषयक ; गुलाबाचा ( रंग , वास , अत्तर ). ०चंदन न. गुलाबासारख्या वासाचें चंदन ; चंदनाची एक जात . जांब , जाम - पु . एक फळ ; रायजांभूळ . [ फा . गुलाब - जामन ] ०झोंप स्त्री. पहांटेची , थंड वेळेची झोंप . ०थंडी स्त्री. सौम्य प्रकारची , सुखावह थंड हवा ( ही गुलाबांना हितावह असते असें म्हणतात ); पहांटेची , थंडी .
|