|
गुलाब कुल, रोझेसी गुलाब, जरदाळू, बिही, रॉसबेरी, स्ट्रॉबेरी, नासपाती, सफरचंद इत्यादि द्विदलिकित फुलझाडांचे कुल. याचा अंतर्भाव गुलाब गणात करतात. प्रमुख लक्षणे- औषधी, वेली, झुडुप व वृक्ष, पाने साधी किंवा संयुक्त व बहुधा उपपर्णासह असतात, बहुधा द्विलिंगी व एकसमात्र फुले, संदले पाच व जुळलेली, पाकळ्या बहुधा पाच व सुट्या, केसरदले अनेक, किंजदले जुललेली किंवा सुटी व बहुधा अनेक, फुले परिकिंज किंवा अवकिंज, फळे विविध, साधी किंवा घोसफळे, बीजे थोडी व अपुष्क.
|