|
अ.क्रि. ( तंजा .) टांकी लावणें . ( सं . उत् + पट ) स.क्रि. उपटून काढणें ; मूळासकट वर काढणें . रंगूनें ती खुंटी सकाळीं उपटली . ( एखाद्यापासून द्रव्य वगैरे ) कपटानें , युक्तीनें काढणें ; लाटणें ; लुबाडणें . माझी खुशामत करुन तुला पैसा उपटणें असेल . - विवि ८ . २ . ४० . हिसकून घेणें ; लांबविणें ; चोरणें ; न कळत घेणें ; पळविणें . उंटावरील हमिणी या भामट्यानें उपटली तर नसेल ? आपटून मारणें . जें पांखिरु एकु चांचुवाडां । धरौनि उपटिलें ॥ - शिशु ८६७ . [ सं . उत + पत - पात , उत्पाटन ] - अक्रि . ( खिळा खुंटी झाड वगैरे भिंतींतून ) बाहेर येणें ; वर येणें . प्रगट होणें ; उजेडांत येणें ; दिसूं लागणें ; ( अंमल ) सुरु होणें . अरे बापरे ! घातवार , व्यतिपात , संक्रांत , किंक्रांत , मरीआई , बारावा बृहस्पति , साडेसाती सारीं एकदम उपटलीं । - भाबं ८९ . उत्पन्न होणें ; प्रादुर्भाव होणें ( एखादी सांथ वगैरेचा ); पुन : उद्भवणें ( रोग ). त्याला कालपासून मूळव्याध उपटली आहे उडणें ; आपटून वर येणें . आपणचि चेंडु सुटे । मग आपणयां उपटे ॥ - अमृ ९ . ५७ . एखाद्यावर तुटून पडणें , रागावणें . रथें रथूं दाटी । गजें गजां उपटी । - शिशु ८८१ . अन्याय केला कोणी आणि मजवर कां उगीच उपटतोस ? . [ सं . उत + पत ]
|