Dictionaries | References उ उमंटणें Script: Devanagari See also: उमटणें , उमठणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उमंटणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ.क्रि. दिसणें ; आढळणें ; प्रकट होणें ; जाहीर होणें ; उघडकीस येणें . हा राजकुमरु उमंटला . - उषा ४८ . ४२ . स्पष्ट होणें ; स्वच्छ होणें ; पूर्ण होणें ( ध्वनि , आवाज वगैरे ). शब्द ना उमटती पुढती . - संग्रामगीतें ७२ . वर येण ; उठून दिसणें ; स्पष्ट होणें . तैसें अवयेवु उमटलें । वालिपें आडौनी । - शिशु ७२० . उमटती अंगावरी काटे । - गीताचंद्रिका २९ . उत्पन्न , उद्भूत होणें ; उपजणें . ऐसी वाट पाहे कांहीं निरोप कां मूळ । कांहो कळवळ तुम्हां उमटेचि ना । - तुगा ४५२ . ऐसा हा सत्त्बगुण । देहीं उमटतां आपण ॥ - दा २ . ७ . ८ . ( ठसा , चित्र , प्रतिबिंब इ० ) वठणें ; स्पष्ट दिसणें ; स्वच्छ , अंकित होणें . जेथ हें संसारचित्र उमटे . - ज्ञा ५ . १५६ . बाहेर पडणें , येणें . वरुणावती बाहेर सप्तयोजन , द्वार केलें उमटावया । - पांप्र १० . १४७ . ( गो . ) उपटणें ; उपटून काढणें . [ सं . उन्मथ - उम्मट ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP