Dictionaries | References

हिसकणें

   
Script: Devanagari

हिसकणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

हिसकणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Jerk, catch and twitch. To bob (money &c.) out of. To mar.

हिसकणें     

उ.क्रि.  १ जोरानें , झटक्याने ओढून घेणे ; झटकणें ; हिसडणें ; जबरदस्तीने घेणें . २ ( ल . ) उपटणें ; उकळणें ; हासडणें ( पैसा इ० ) ३ फिसकटविणें ; बिघडविणें ( काम ; योजना ; मसलत ) [ सं . हिष्कर्पण ? हिं . हिसकना ] हिसकणी - स्त्री . हिसडा ; झटका ; हिसकणें पहा . हिसका - पु . १ हिसकणी ; झटक्यानें ओढणें व त्यापासून झालेली स्थिति . ( क्रि० देणे ; बसणें .) २ अकल्पित बसलेला तडाखा ; झपाटा ; सपाटा ; आचका ; हिसडा आणि त्यापासून उद्भवलेला त्रास , होणारा परिणाम . ३ ( ल . ) ( चालू काम , धंदा ) एकदम बंद पडणें ; विघ्न येणें ; विघ्न ; अडथळा . ४ ( ल . ) निष्फळ व दगदगीचा प्रवास ; खेप ; हेलपाटा . [ हिं ] हिसकावणी - स्त्री . जोरानें ओढून घेणें ; हिसडणी . हिसकावणें - उक्रि . हिसकणें ; जोरानें ओढून घेणें ; अन्यायाने व बळानें घेणें ; बळकावणें . हिसकाहिसक , हिसकाफिसक - स्त्री . ( अनेकांनी केलेली ) ओढाताण ; झटापट ; ओढाओढी ; झटापट ; ओढाओढी . हिसडणें - उक्रि . हिसकणें ; हिसका देणें . हिसडा , हिसडी - पुस्त्री . हिसका ; झटका .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP