|
न. हद्दपारी ; वतनापासून दूर करणें ; वतन काढून घेणें . ( क्रि० करणें ). हांडे याचें पारपत्य जला - वतन करणें . - वाडसनदा ७० . [ अर . जला = हद्दपारी ] न. ओतणे - णी पहा . वंशपरंपरेची चाकरी , धंदा , अधिकार , नेमणूक , उत्पन्न ; उपजीविकेचे साधन . - गांगा १६ . मालकीची जागा ; जन्मभूमि ; घर . इनाम ; बक्षीस . दिधलो गुरु प्रसाद प्रभुने पूर्वोक्तसद्गुणां वतन । - मोकर्ण २० . २९ . वंशपरंपरा हक्क ( जमीन , वृत्ति इ० त ). [ अर . वतन = जन्मभूमि , घर . तुल० सं . वर्तन = उदरनिर्वाह , वेतन ] गाडणे - एखाद्या जागी मालकी , सत्ता असणे ( नेहमी नास्तिपक्षी उपयोग ). तूं नित्य येथे येऊन बसतोस , काय येथे तुझे वतन गाडले आहे . ०गाडले न. ( गाडलेले वतन ) जुनी किंवा फार दिवस ताब्यात असलेली मिळकत . माझी वंशपरंपरा ह्याच जागेवर नांदून वतनगाडले आहे ते मी सोडणार नाही . ०जप्ती स्त्री. वतनी जमीन किंवा तीरावरील उत्पन्नाची जप्ती . ०दार पु. वतन असलेला ; वतन धारण करणारा . वतनदारांची वतने वतनदारांच्या दुमाला केल्या विरहित पोटतिडीक लागोन मुलूक मामूर होत नाही . - रा १६ . ४४ . ( कायदा ) वंशपरंपरेने सरकारी काम करण्याचा हक्क असणारा इसम . तीर्थोपाध्याय , मंदिरवाले , दरगेवाले , फिरस्ते , हुन्नरी व मनोरंजनाचा धंदा करणारे , भिकारचोरटे वगैरे वतनदार स्वतःला म्हणवितात ... सर्व गांवकर्यांना मग ते कोणत्याहि धंद्यावर पोट चालवोत वतनदार ही सामान्य संज्ञा आहे . - गांगा १५ . [ फा . ] ०दार हिजडा पु . हिजडा पहा . ०दारी दारकी स्त्री . वतनाचा हक्क , मालकी ; वतन असणे . ०दारीकरी पु. ( वतनदार ) ( कों . ) फार जुना शेतकरी . ०पत्र न. वतनांची सनद , दस्तऐवज . ०बंधु भाऊ - पु . वडिलोपार्जित मिळकतीत हक्क असणारा ; भागीदार . सह - अधिकारी ( वंशपरंपरागत ); देशमुखबंधु . वतनबहिण असाहि शब्द येतो . ०वाडी स्त्री. वतन , वतनी शेत , वाडी इ० ( व्यापकपणे ); जमीनजुमला ; इस्टेट . वतनवाडी पाहून विकत घेतलेली ( जमीन , मालमत्ता इ० ). वतनासंबंधी ( दस्तऐवज , कागदपत्र , इ० ). वतन आहे किंवा जन्म झाला ते ( ठिकाण ). वतनी मिळकत - स्त्री . ( कायदा ) वंशपरंपरेने किंवा नक्त नेमणूक .
|