Dictionaries | References

मिरास

   
Script: Devanagari

मिरास

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   in a village. 2 land-tax.

मिरास

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  An hereditary office (with land attached) in a village.

मिरास

   स्त्रीन .
   वडिलोपार्जित वतन ; दायभाग ; वंशपरंपरा संपत्ति ; स्थावर मालमत्ता ( विशेषतः शेत , जमीन इ० ); वतनदारी . निपुत्रिकांचें मिरास तें दिवाणाचें - रा ८४९ .
   जमिनीवरील कर . [ अर . मीरास ]
०पुरणें   गाठोडें पुरणें ; महत्त्वाची गोष्ट एखाद्या ठिकाणीं ठेवलेली असणें .
०जमीन  स्त्री. वतनदारीची जमीन ; वडिलोपार्जित जमीन . जमीनसारा थकला तरी तीन वर्षानंतर मिरासदार परागंदा झाल्याशिवाय मिरास जमीन खालसा करण्याचा सरकारला हक्क नव्हता . - गांगा १२ .
०झाडा  पु. मिराशीची आणि मिरासदारीची कलमबंदी .
०दार   मिरास्दार मिराशी सी - पु .
   मिराशीचा उपभोग घेणारा ; वतनदार ; थळकरी ; सरकारसारा नियमानें भरुन आपलें स्वामित्व कायम ठेवणारा शेतमालक . वडगांवीची मोकदमीस कोण्ही मिरास्दार नाहीं . - रा १७ . ३२ .
   माहार ; महारकीचें वंशपरंपरा वतन भोगणारा महार . मिराशीचे चार प्रकार - १ वतनदार ,
   मिरासदार ,
   उपरी ,
   ओवांडकरु . [ फा . मीरासीदार ]
०पट्टी   टी - स्त्री . मिरास जमिनीवरील कर ; कायम लावणीचे जमिनीवरील कर . मिरासपटी तिसरे सालीं घ्यावी . - वाडसमा ४ . ६७ .
०पत्र  न. मिराशीच्या हक्काचा लेख .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP