Dictionaries | References

चौचाकी पांढर

   
Script: Devanagari

चौचाकी पांढर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

चौचाकी पांढर

  स्त्री. गांव ; गांवकरी ; गांववस्ती ; गांवचे गरीब सुखवस्तू इ० सर्व लोक . ( क्रि० मिळणें ; जमणें ; गोळा होणें ). चौचाकी यांतील चार चाकांच्या अर्थासंबंधीं बराच मतभेद आहे . कांहींच्या मतें ही चौचाकें म्हणजे देशमुख , देशपांडया , पाटीलकुळकर्णी हीं ( चार चाकें ) होत . कांहीं लोक सूर्याचे , कुंभाराचें , तेल्याचें व गाडयाचे अशीं ( गांवाचीं ) चार चाकें मानितात ; कोणीलें सरकार , २ रें पाटील , कुळकर्णी , देशपांडया , देशमुख ; ३ रें मिरासदार , कांहीं लोक असें म्हणतात कीं खेडेगांवचे लोक जो कोणी नेता भेटेल त्याच्या तंत्रानें वेळेनुसार वागणारे , प्रसंग पाहून पुढेंमागें , उजवीकडे , डावीकडे वळणारे व अस्थिर बुध्दीचे असतात त्यावरून हा वाक्प्रचार रूढ झाला आहे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP