Dictionaries | References ग गोतवळा Script: Devanagari See also: गोतगंगा , गोतपत , गोतपात , गोतवळ Meaning Related Words गोतवळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु.स्त्री.न. भांडण , बहिष्कार इ० च्या चौकशीसाठीं जमलेली जातीची सभा , पंचायत ; जातीचें कोर्ट ; निवाडाकचेरी . ( सामुदायिक ) एकत्रित झालेली जात ; सबंध जात ; गोत्रज . ( सामुदायिक ) नातेवाईक मंडळी ; सगेसोयरे ; भाऊबंद . सांडून सर्वहि गोत । - दा २ . १ . ९ . नातें . आलुतेबलुते . ( पेशवाईतील ) धार्मिक किंवा सामाजिक अपराधांच्या चौकशीसाठीं किंवा दत्तक , वांटणी , वतन इ० चा निर्णय देण्यासाठीं भरणारी गांवांतील सरकारी कामगार , वतनी अधिकारी , अलुतेबलुते व प्रतिष्ठित माणसें यांची न्यायनिवाडा करण्याची सभा ; हिनें दिलेला निवाडा सरकारहि सहसा फिरवीत नसे . [ सं . गोत्र ] ( वाप्र . )०मिळणें एकत्र जुळणें , जथणें . मिसळणें ; संयोग , एकजीव होणें . ताकाचें व तेलकट भाजीचें गोत मिळत नाहीं . एकमत होणें ; जुळणें ( मुद्दे , गोष्टी ). सख्य होणें . पूर्वापर गोष्टींचा संबंध जुळणें . म्ह० कुर्हाडीचा दांडा गोतास काळ = स्वकीयांशीं फितूर होणारा माणूस . सामाशब्द -०घोडा पु. अगम्यगमन करणारा माणूस . अशिक्षित , अक्षरशत्रु असें मोठें मूल ; पोळ ; म्हशा . कुटुंबांतील शुंभ , ढ माणूस .०पत, पात गोताई स्त्री. जातिबहिष्कृत , गुन्हेगारास शुध्द करून पुन्हां जातींत घेण्याच्या वेळचा संस्कार ; प्रायश्चित्ताचें जातजेवण . जातसभा ( मराठयांत ); पतितास आपल्या पंक्तीस घेऊन जात त्याला पावन करते तो विधि .०पत्र न. वंशावळ .०पुडया स्त्री.अव. ( खा . ) देवप्रतिष्ठा . गोतपुडया बांधून टाक = देवप्रतिष्ठा बसव . महजर पु. गोतसभेनें दिलेलें निकालपत्र , निकाल ; थळपत्र . गोताई स्त्री. गोतसभा ; ग्रामसभा . गोतपत अर्थ १ पहा . गोतावळ , गोतावळें , गोतावळा , गोतोळा गोत ; गोतसभा ; गोतगंगा . [ सं . गोत्र + आवलि . म . गोत + ओळ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP