Dictionaries | References

उपरी

   
Script: Devanagari

उपरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A sojourner; a lodger; a temporary resident; one dwelling where he has no property in the soil. 2 A tenant or farmer having no right of occupancy; as opp. to थलकरी A landed proprietor.
After, further, onwards, to proceed.

उपरी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A sojourner, a lodger.
ad   After, further.

उपरी     

वि.  
गांवांत जमीन , वतन नाहीं असा ; मिरासदार नसणारा ; तात्पुरता राहणारा ; स्वत : ची मालकी नाहीं अशा जागीं राहणारा .
( ल . ) उडाणटप्पू ; आगापिछा नसलेला . एखादा उपरी पोर धरुन आणून स्वर्गाचे दरवाजे मोकळे करुन घेतल्याचें सुख मानून घ्यावयाचें - टि ४ . १८ . म्ह० उपरे आले आणि धनी झाले .
खंडानें , कौलानें जमीन करणारा ; खंडकरी ; खेडूत ; थलकरी याच्या उलट ;
वरिष्ठ ; वरचा . चित्त्यास शिकारीचे सवईसाठीं उपरी अधिकार्‍याच्या परवानगीनें नेणें . - चिमा . ( बडोदें ) २८ . - क्रिवि . नंतर ; पुढें ; वर उपरि पहा . उपरी बोले रामललना । - रावि २० . १३९ . ( पत्रांतून ) आशीर्वाद उपरी ; विनंती उपरी , इ० - स्त्री . माडी मग ते सप्तखणांची उपरी । तेथें ठेविली राये कुमरी ॥ - कथा १ . ६ . ३५ . - पु . उंचवटा . स्वामिपूजेसि ते अवसरीं । स्थळ केलें उपरीवरी । - संवि १३ . १३८ . ( गो . ) [ सं . उपरि ; सिं . ओपिरो ; गु . उपरी ; हिं . उपर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP