प्रकाश हरी कार्लेकर - रस्त्यांवरून चालताना मुल...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


या शहराचं दुर्भाग्य
रस्त्यांवरून चालताना
मुलं बिचकतात
वयस्कर धास्तावतात
खड्यांना, वाहनांना.

धसमुसळे बाइकस्वार तरूण
पाहता पाहता एकेरीवर येतात
आई-बहीणीचा उद्धार करीत
हातघाईवरही येतात.

मुलं दचकून थबकतात
वयस्कर सुरक्षित कोपर्‍यात शिरतात
मध्यमवयीन स्त्री-पुरूष क्षणभर थांबून
मार्गस्थ होतात.

रस्ते हताश होतात
नागरिकांच्या, अधिकार्‍यांच्या,
लोकप्रतिनिधींच्या नावने
कटाकटा बोटे मोडतात.

कोठलासा समारंभ निघतो
लोकार्पणाचा
रस्ते रातोरात
चकचकीत होतात.

लोकप्रतिनिधी लोकार्पण करतो
सार्वजनिक स्वच्छतागृह
’वा! काय छान रस्ते आहेत हो-’ म्हणत
अधिकार्‍याची पाठ थोपटतो.

’अमुक तमुक दादा आगे बढोss’
कार्यकर्ते जल्लोष करतात
लोकप्रतिनिधी काळ्या काचांच्य गाडीत बसतो
या सगळ्यात नागरिक कुठेच नसतो.

या शहराचं दुर्भाग्य
असं पिढ्यान् पिढ्या
पावलोपावली
सोबतीला.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:32.6400000