मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
‘ ओळखलंत का भाऊ मला ? ’ र...

योगेश दामले - ‘ ओळखलंत का भाऊ मला ? ’ र...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


‘ ओळखलंत का भाऊ मला ? ’ रिक्वेस्ट पाठवे कोणी
प्रोफाइल पिकवर जॉन, हृतिक, सचिन किंवा धोनी

ऍक्सेप्ट केलं, ऍड केलं, क्षणभर त्याला पाहून
फ्रेंड्स लिस्टमध्ये घुसल्यावर स्म्वाद गेला राहून

‘ चड्डीबड्डी ’ मित्रासारखा प्रोफाइलवरती नाचला
अर्धे मित्र बळकावले, बॉस मात्र वाचला !

‘ स्टेटस ’ वाचले, ‘ कोट ’ ढापले, होते नव्हते नेले
‘ संता - बंता ’ ‘ सुविचार ’ मध्ये ‘ टॅग ’ तेवढे केले...

वैतागून या असल्यांची आता यादी करीन म्हणतो,
सुटी लागता फ्रेंड्स लिस्टवरचा गाळ काढीन म्हणतो

टोमणा माझा झोंबल्यावरती हसत हसत उठला
फुटकळ फुटकळ पोस्ट्सनाही ‘ लाइक ’ करत सुटला

भंगार झाली वॉल, तरी मोडला नाही कणा
थातूरमाथूर अपलोड्सनाही, फक्त ‘ लाइक ’ म्हणा !

- कुसुमाग्रजांची माफी मागून - विनयानुज

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP