केशव सखाराम देशमुख - दु:ख कोणत्या रंगात मिसळता...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


सव्वा लाखाच्या मुठीतून
दु:ख कोणत्या रंगात मिसळता येईल ?
हास्य कसं भरून ठेवता येईल बादलीत ?
ओळख साठवून ठेवणारे रांजण कोण फ़ोडू पाहत आहे ?
**

तडजोडीत स्वप्नं फ़ाटू लागली आहेत !
सुखाची पट्टी इंचाइंचानं वाढू पाहतेय...
आकांक्षा होऊन बसल्यात
परवडू न शकणार्‍या महागड्य्य मोटारींसारख्या
**

मूठ सव्वा लाखाची असली तरीही
लाखापुढला पंचवीस हजारांचाच विश्वास खरा !
नऊ हात ढलपी
सात हातांच्या लाकडाला
कुणी धरली गृहीत ?
कल्पना आणि सत्य यांचं
असं भांडण सुरू आहे
या चौकात...
त्या चौकात...!

Translation - भाषांतर
N/A

References :
९४२२७२१६३१
Last Updated : 2016-11-11T12:52:32.0630000