मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
सूर्यालाही ग्रहण लागते रा...

उद्धव भयवाळ - सूर्यालाही ग्रहण लागते रा...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


सूर्यालाही ग्रहण लागते
रामालाही हो वनवास
तुमचे - माझे जगणे हे तर
अर्धे सत्य नि अर्धा भास

‘ असे करू अन् तसे करू ’ चा
पोकळ डौल नि खोटी आस
जरी चेहरा वरून हसरा
आत परंतू चित्त उदास

‘ नको काळजी, घोर नि चिंता ’
म्हणणे सोपे हे असते
अन्न राहु द्या...वेळप्रसंगी -
- घशात पाणीही बसते !

स्वप्नकळ्यांची फुले होउनी
सुगंध देतिल...खात्री काय ?
गालिच्यावरी चालत असता
फाटक्यात कधि जाई पाय !

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP