मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
पावलांना तीक्ष्ण काटेही स...

बालस्वरुप राही - पावलांना तीक्ष्ण काटेही स...

अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


पावलांना तीक्ष्ण काटेही सुखविती आज माझ्या
प्राण तर वाटेवरी नाहीस अंथरला न तू ?

भोवतीची आज झाली ओलसर का ही हवा ?
आज या तल्खीतसुद्धा जाणवे का गारवा ?
कृष्णवर्णी मेघमाला ही तुझ्या पदराप्रमाणे
लोचनी श्रावण सखे पण रोखला नाहीस ना तू ?

ही अमेची रात्र आहे दाटली धरतीवरी
तारका बघतात सार्‍या वाट कोणाची तरी
दाट काळोखातही पण वाट माझी उजळलेली...
अन् दिवा दारी तिथेही लावला नाहीस ना तू ?

का फुलांचे रंगसुद्धा आज हे पडले फिके ?
तारकामंडल नभीचे मंद का हे लुकलुके ?
चंद्रसुद्धा कृष्णमेघांतून हा संकोचलेला
लोचनी काजळ सखे नाहीस ना भरलेस तू ?

पावलांना तीक्ष्ण काटेही सुखविती आज माझ्या
प्राण तर वाटेवरी नाहीस अंथरला न तू ?

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP