वर्षा चोबे - दहशतीच्या पटावर समोरासमोर...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


चेकमेट
दहशतीच्या पटावर
समोरासमोर आहेत
काळया-पांढर्‍या फ़ौजा
दोन विचारप्रवाहांच्या

प्यादी मारली जाताहेत
मोठ्या संख्येनं
कधीमधी उंट-घोडेही

ते काबीज करताहेत
त्यांचं एकेक लक्ष्य
कासवगतीनं

कधी याची सरशी, तर कधी त्याची

सोंगट्या मरतात...
जिवंत होतात...

एकमेकांच्या चालीनं
किती पिढ्या खेळणार
हा सत्तेचा खेळ ?

काळ्या-पांढर्‍या फ़ौजेत
कधी होणार चेकमेट ?

Translation - भाषांतर
N/A

References : ९४०३९७७२६६
Last Updated : 2016-11-11T12:52:31.3270000