मनोज बोरगावकर - तू ईनमीन वर्षादीडवर्षाचा ...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


अंगावर पाजायला सांगतो
तू ईनमीन वर्षादीडवर्षाचा
हातानं मुंग्या मारतोयस सर्सर
मुंग्यांची पावडर नेम धरून टाकताना
अन् त्यांची लालगच्च तडफ़ड
निवेपर्यंत पाहता पाहता मी
मनाशी खूणगाठ बांधतो
तुझ्यातली हिंसा कमी केली पाहिजे.

बेटा किमान हिंसेचं
सोफ़िस्टिकेशन तरी तुला
आलं पाहिजे करता
या रोखठोक निष्कर्षापर्यंत मी पोचलेला

तुझ्यातली टोकदार हिंसा
आटोक्यात आणण्यासाठी मी
अनेक पर्याय शोधून बघतो
शेवटी तुझ्या आईला तुला
अंगावर पाजायला सांगतो.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:32.5300000