मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
शर्यतीच्या वाटॆवर स्वत:ला...

ऋचा कन्हेरकर - शर्यतीच्या वाटॆवर स्वत:ला...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


शर्यतीच्या वाटॆवर स्वत:ला सापडताना
जेव्हा पाय आपोआप घरटयाकडदं वळतील...
तेव्हा तिच्या हातातल्या चहानं अन्‍ स्मितहास्यानं
चेहर्‍यावरच्या घडया आपोआपं मिटतील..
तेव्हा त्या क्षणि ‘ती ’ जिंकलेली असेल
जबाबदारी़च्या ओझ्यानं सगळ्याच
दगडांवर पाय ठेवताना
जेव्हा शब्द कुणावर तरी आदळायच्या
मन: स्थितीत असतील
तेव्हा तिच्या ऐकून घेण्याच्या स्वभावानं
अन्‍ शांत चित्तानं
डोक्यातल्या झणझणणार्‍या तारा
आपोआप शांत होतील...
तेव्हा त्या क्षणी ‘ती’ जिंकलेली असेल..
अनोळखी, नवीन गर्दीत एकटं एकटं वाटत असताना
जेव्हा डोळे आपला हक्काचा माणूस
आपोआप शोधतील
तेव्हा अलगद स्पर्शानं अन्‍ स्नेहार्द्र नजरेनं
शिणलेल्या देहाला आपोआप दिलासा मिळेल
तेव्हा त्या क्षणी ‘ ती ’ जिंकलेली असेल...
शब्दाशब्दांच्या चकमकीच्या लढाईत
विश्वासाची मोहोर उमटवताना
जेव्हा सर्व वाटा आपोआप बंद झाल्याचा भास होईल
तेव्हा ठामपणॆ धरलेल्या हातानं अन्‍ न डगमगणार्‍या प्रेमानं
भिरभिरणार्‍या पावलांना दाही दिशा मुक्त होतील...
तेव्हाच त्या क्षणी ‘ती’ जिंकलेली असेल...

N/A

References : N/A
Last Updated : December 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP