मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय सतरावा|
श्लोक ४० वा

एकनाथी भागवत - श्लोक ४० वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


इज्याध्ययनदानानि सर्वेषां च द्विजन्मनाम् ।

प्रतिग्रहोऽध्यापनं च ब्राह्मणस्यैव याजनम् ॥४०॥

ब्राह्मणाचें षट्कर्म जाण । यजन आणि याजन ।

अध्ययन आणि अध्यापन । प्रतिग्रहो दान हें साही ॥१॥

हो कां द्विजन्मे तिन्ही वर्ण । त्यांत क्षत्रिय वैश्य दोघे जण ।

त्यांस तीं कर्मीं अधिकारपण । यजन-दान-अध्ययन ॥२॥

जे उत्तमजन्मे ब्राह्मण । त्यांसी षट्कर्मीं अधिकार जाण ।

तीनी परमार्थासी पूर्ण । जीविकावर्तन तीं कर्मीं ॥३॥

कोणें कर्में जीविकेसी । कोणें पाविजे परमार्थासी ।

त्या ब्राह्मणकर्मविभागासी । ऐक तुजपाशीं सांगेन ॥४॥

`यजन' तें यज्ञाचरण । `अध्ययन' तें वेदपठण ।

`दान' जें देणें आपण । हें त्रिकर्म जाण परमार्था ॥५॥

गुरुत्व घेऊनि आपणें । `याजन' तें याग करविणें ।

`अध्ययन' वेद पढवणें । स्वयें दान घेणें तो `प्रतिग्रहो' ॥६॥

जाहलिया सच्छिष्यसंपत्ती । इये तिहीं कर्मीं जीविकावृत्ती ।

गुरुत्वें गुरुपूजाप्राप्ती । तेणें जीविकास्थिति ब्राह्मणां ॥७॥

क्षत्रियवैश्यद्विजन्म्यांसी । गुरुत्व बोलिलें नाहीं यांसी ।

हीं तिन्हीं कर्में त्यांसी । निषेधतेसी यालागीं ॥८॥

आतां ब्राह्मणाचें लक्षण । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण ।

`मुख्य' `मुख्यतम' `साधारण' । त्रिविध जाण उद्धवा ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP