अग्नौ गुरावात्मनि च सर्वभूतेषु मां परम् ।
अपृथग्धीरुपासीत ब्रह्मवर्चस्व्यकल्मषः ॥३२॥
ब्रह्मचर्यव्रत धरणें । ब्रह्मवर्चस्व चढे तेणें ।
आणि सद्गुरूचेनि भजनें । निष्पाप होणें निजवृत्तीं ॥३५॥
तेथें अग्निगुरु आपण । सर्व भूतांच्या ठायीं जाण ।
अभिन्न ब्रह्मभावन । अनुसंधान सर्वदा ॥३६॥
तेव्हां जें जें देखे दृश्यजात । तेथ ब्रह्मभावो अचुंबित ।
यापरी मातें उपासित । ब्रह्मयुक्त सद्भावें ॥३७॥
नैष्ठिक ब्रह्मचर्याचा नेम । वानप्रस्थसंन्यासिया सम ।
तेथील आवश्यक जो धर्म । मुख्य वर्म त्यागाचें ॥३८॥