वर्णानामाश्रमाणां च जन्मभूम्यनुसारिणीः ।
आसन्प्रकृतयो नॄणां नीचैर्नीचोत्तमोत्तमैः ॥१५॥
जैसें जन्म जेसें स्थान । त्या वर्णाश्रमा तैसे गुण ।
उत्तमीं उत्तमत्व जाण । नीचीं नीचपण सहजेंचि ॥८१॥
`सत्त्वप्राधान्ये' ब्राह्मण । `सत्त्वरजें' क्षत्रिय जाण ।
`रजतमें' वैश्यवर्ण । शूद्र ते जाण `तमोनिष्ठ' ॥८२॥
तेचि ब्राह्मणादि चारी वर्ण । त्यांचें प्रकृतींचे लक्षण ।
वेगळें वेगळेंचि पैं जाण । स्वयें नारायण सांगत ॥८३॥