मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय सतरावा|
श्लोक ३८ वा

एकनाथी भागवत - श्लोक ३८ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


गृहं वनं वोपविशेत्प्रव्रदेद्वा द्विजोत्तमः ।

आश्रमादाश्रमं गच्छेत् नान्यथा मत्परश्चरेत् ॥३८॥

ज्यासी वैराग्य नाहीं सर्वथा । हृदयीं स्त्रीकामाची आस्था ।

तेणें द्वितीयाश्रमसंस्था । गार्हस्थ्या करावें ॥७५॥

स्त्रीकामु तरी नावडे । विवेक वैराग्य ज्यासी थोडें ।

तेणें वानप्रस्थाश्रमाकडे । निघावें रोकडें तत्काळ ॥७६॥

जो विवेकतेजें दीप्तिमंत । ज्यासी सदा वैराग्य धडधडित ।

जो सर्वार्थी दिसे विरक्त । त्यासीच निश्चित चतुर्थाश्रम ॥७७॥

मुख्यत्वें ज्यासी ब्राह्मणजन्म । तेचि बोलिजे द्विजोत्तम ।

त्यासीच बोलिला चतुर्थाश्रम । वैश्यक्षत्रियां नेम संन्यासी नाहीं ॥७८॥

क्षत्रीय संन्यास अंगीकारिती । तिंही रिघावें महापंथीं ।

दंड-कमंडलादिप्रवृत्ती । व्यवहारस्थिती त्यां नाहीं ॥७९॥

ब्राह्मणासी ब्रह्मचर्याच्या पोटीं । धडधडीत जैं वैराग्य उठी ।

तै संन्यासपरिपाठीं । उठाउठीं अंगीकारु ॥३८०॥

बैसतां भार्येच्या पाटीं । बहुल्यावरी वैराग्य उठी ।

त्यासी संन्यासग्रहणीं गोठी । अधिकारु श्रेष्ठीं बोलिला ॥८१॥

संन्यासग्रहणीं ज्याचें । वैराग्य दिसे अर्धकाचें ।

त्यासी संन्यासग्रहणाचें । योग्यत्व साचें असेना ॥८२॥

जैसा कां वोकिला वोक । ज्याचा त्यास नावडे देख ।

तैसें विषयभोगसुख । ज्यासी निःशेष नावडे ॥८३॥

त्यासी संन्यासीं अधिकारु । तोचि संन्यासी साचारु ।

ज्यासी विषयांचा विकारु । अणुमात्रु बाधेना ॥८४॥

प्रथम ब्रह्मचर्ययुक्त । वैराग्य न चढेचि हात ।

तरी हो‍ऊनि गृहस्थ । स्वधर्मयुक्त वर्तावें ॥८५॥

तेथें स्वधर्में विषय सेवितां । दृढ साधावी विरक्तता ।

तेथेंही वैराग्य न ये हाता । तरी वानप्रस्थाश्रमी व्हावें ॥८६॥

यापरी आश्रमादाश्रमा जातां । वैराग्यें संन्यासग्रहणता ।

परी अनाश्रमीं तत्त्वतां । नाहीं सर्वथा अधिकारु ॥८७॥

सांडूनि पूर्वाश्रमासी । जो गेला आश्रमांतरासी ।

तेथूनि पुढारां मार्ग त्यासी । परी मागें यावसायी विधि नाहीं ॥८८॥

कां मत्पर जो माझा भक्त । त्यासी आश्रमनेम नाहीं येथ ।

तो माझेनि भजनें कृतकृत्य । जाण निश्चित उद्धवा ॥८९॥

सद्‍भावें माझी भक्ति करितां । विवेकवैराग्य-योग्यता ।

पावोनि माझी पूर्ण सत्ता । सायुज्यता नेघती ॥३९०॥

ऐसे माझे भक्तोत्तम । त्यांसी न लगे आश्रमनेम ।

त्यांचा सर्वही मी स्वधर्म । ऐसें पुरुषोत्तम बोलिला ॥९१॥

उद्धवा ऐक पां निश्चितीं । गृहस्थाची स्वधर्मस्थिती ।

समूळ सांगेन तुजप्रती । ऐसें श्रीपति बोलिला ॥९२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP